Email - info@legalservices.top
• KVS Educational Consultant
• RTE Educational Gauidance
• JNV Form Free Gauidance
Google review
4.9 Google Rating
9+ Years experience
Trusted by 40k+ people
around India

RTE INFORMATION
RTE बाबत :
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (शासकीय, खाजगी) तसेच समाज कल्याण, आदिवासी विकास विभाग, अपंग आयुक्तालया मार्फत चालवल्या जात असलेल्या शाळा अशा शाळांमधून सुमारे २.२५ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंमलबजावणी करताना शाळास्तरावरून वारंवार माहिती घ्यावी लागते. ही माहिती तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यास शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय यंत्रणा यांचा बरासचा वेळ खर्च होतो. त्यामध्ये वेळेची बचत होऊन सदर वेळ विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने विद्यार्थी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
तसेच सदर प्रणालीमुळे विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी सर्व घटकांना विद्यार्थ्याची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होईल.
आपणा सर्वांना विद्यार्थी माहिती संकेत स्थळाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास आहे.
आर. टी. ई. २५% प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली १ किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी १ किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांची निवड करून फॉर्म सबमिट केला आहे, तसेच ज्या पालकांनी / विद्यार्थ्यांनी RTE २५% प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, त्यांना आता प्रवेशासाठी १ किमी, १ ते ३ किमी तसेच ३ किमी पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत. या अनुषंगाने संबंधित पालकांना पालक लॉगिनमध्ये Unconfirm करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे सर्व संबंधितांनी आपला सादर केलेला फॉर्म Unconfirm करून आवश्यक ती सुधारित माहिती नोंदवावी.
Go to Official Web Site (https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new)
1) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.
2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
3) आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !
4) प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे.
5) अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.
6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.
7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.
8) अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.
9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.
10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .
12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
11) सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .
12) सन 2026-2027 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
13) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून Google Map वर पत्ता टाकून मिळालेले Lattitude,Longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
FREE SOCIAL SUPPORT FOR RIGHT TO EDUCATION EDUCATION CONSULTANT IN NAGPUR
👇🏻FREE ADVICE FOR👇🏻
Frequently Asked Questions
1.What is a RTE?
RTE education, or Right to Education, refers to the fundamental right of every child aged 6 to 14 to receive free and compulsory education in India. This right is enshrined in Article 21A of the Indian Constitution and is implemented through the Right to Education Act, 2009. The RTE Act ensures that all children, regardless of their background, have access to quality elementary education.
2. Why do I need a RTE?
The Right to Education (RTE) Act in India ensures free and compulsory education for children aged 6-14, making it a fundamental right and a crucial step towards empowering individuals and building a stronger society. This act aims to reduce inequalities, promote social justice, and provide everyone with the opportunity to learn in Top School in Your City.
3. How do I start the process with RTE Free Education?
To begin the RTE (Right to Education) process in Maharashtra, parents need to first check eligibility, gather necessary documents, and then apply online through the official Maharashtra School Education Department portal. The process involves registering, filling out the application form, uploading documents, and submitting the application. After submission, parents should track their application status and await the lottery results for seat allocation.
4. What documents are required for RTE?
For Right to Education (RTE) admissions, you'll generally need a birth certificate, address proof (like a ration card or Aadhaar card), and a caste certificate (if applicable). Income certificates and parent/guardian Aadhaar cards are also often required. Some states may have specific requirements, so it's best to check the official website for your state's RTE admissions process.